बातम्या

T20 World Cup स्पर्धेत हा 15 वर्षीय क्रिकेटपटू खेळणार...

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : आयसीसी महिला टी20 विश्वकरंडाकासाठी आज भारताचा संघ जाहीर करण्यात आला. हरमनप्रीत कौरकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले असून स्मृती मानधनाकडे संघाचे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. आयसीसी महिला टी20 विश्वकरंडकाला 21 फेब्रवारीपासून सुरवात होणार आहे. 

भारतीय संघात फक्त एक बदल केला आहे. बंगालची फलंदाज रिचा घोष हिला विश्वकरंडकात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. रिचाने महिला टी20 चॅलेंजर करंडकात केलेल्या तुफानी खेळीमुळे तिला संघात स्थान देण्यात आले आहे. तिने महिला चॅलेंजर करंडकातील एका सामन्यात चार चौकार आणि एका षटकारासह 26 चेंडूंत 36 धावा केल्या होत्या. 

Squad Announcement@ImHarmanpreet will lead India's charge at @T20WorldCup #T20WorldCup #TeamIndia pic.twitter.com/QkpyypyJKc

— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2020

भारतीय संघात दिप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्ती या अष्टपैलू म्हणून जबाबदारी स्वीकारतील. गोलंदाजीमध्ये अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव यांनी स्थान कायम राखले आहे. 

15 वर्षांची शेफाली खेळणार वर्ल्ड कप
भारत सी संघाकडून महिला टी20 चॅलेंजर करंडकात उल्लेखनीय कामगिरी केलेली 15 वर्षांची शेफाली वर्मासुद्धा वर्ल्डकपला निघाली आहे. तिने या स्पर्धेत 156.20 च्या स्ट्राईक रेटने 189 धावा केल्या. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात तिने 48 चेंडूंमध्ये 89 धावांची तुफानी खेळी केली. 

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, हरलीन देओल, वेदा कृष्णमूर्ती, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, पूनम यादव, राधा यादव, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष 

Web Title: Indian squad for Womens ICC T20 World Cup declared

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT